१४ वर्ष वयोगटातील संघ उपविजेता व १७ वर्षे वयोगटातील संघाची जिल्हास्तरासाठी दिमाखात निवड
परंडा, प्रतिनिधी दि. २१ सप्टेंबर २०२६ : येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटाचा संघ उपविजेता व १७ वर्षे वयोगटातील संघाने दमदार कामगिरी करत दणदणीत विजय मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सतरा वर्ष वयोगटातील संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट ) शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी व नवनिर्वाचित नगरसेवक मजहर दहलूज व
प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद आणि पर्यवेक्षक प्रवीण शेरे यांनी केले.
यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शशिकांत नलावडे, उत्तरेश्वर सूर्यवंशी, पुरुषोत्तम डोंबाळे, तसेच संघाचे प्रशिक्षक राहुल काशीद व विठ्ठल शेळके उपस्थित होते. जय हनुमान विद्यालय, वाटेफळचे शिक्षक तानाजी हजारे, जिल्हा परिषद शाळा जवळा येथील शिक्षक श्रीराम घोडके, पंच ज्योतीराम गिरवले, रावसाहेब विद्यालयाचे शिक्षक करंडे सर, नवीन माध्यमिक विद्यालय, रोहकलचे शिक्षक उंबरे सर, रत्नापूर शाळेचे शिक्षक तरंगे सर, संत मीरा शाळेचे शिक्षक काळे सर, पवित्राताई दैठणकर, रत्नापूर शाळेचे शिंदे सर, सहसंयोजक महेश शिंदे सर, दीपक ओव्हाळ , दत्तात्रेय येमले ,कवडगाव जिल्हा परिषद शाळेचे बालाजी शिंदे तसेच विविध शाळांतील शिक्षक उपस्थित होते.उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दिवसभर झालेल्या सामन्यांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
महात्मा गांधी विद्यालयाच्या १४ वर्ष वयोगट उपविजेता व १७ वर्षे वयोगटातील संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविल्याने विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. सतरा वर्ष वयोगटातील संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
*१४ वर्ष वयोगटातील खेळाडू,*
अंतरा देशमुख, प्रणिती गोडगे , सिद्धी जगदाळे ,प्रणिती कोकाटे ,जानवी साळुंखे, श्रावणी कदम ,अनुष्का शिंदे, राधा मिसाळ, सई जगदाळे, सोफिया भोले, पूर्वा घोगरे, सृष्टी गायकवाड, आदिती आदमीले ,अलमास कोतवाल, श्रेया घोगरे.
१७ पुरुष वयोगटातील खेळाडू
श्रद्धा नाईकवाडी ,दिव्या मस्के, प्रणिता कोळेकर, श्रुती कोळेकर ,प्रगती गोडगे, सानिका मेहेर, प्रतीक्षा गोडगे, राधा कोकाटे ,भाग्यशाला साळवे, रोशनी ठवरे ,योगिता घोडके ,तेजस्विनी ठवरे ,अंकिता जगताप.
या खेळाडूंचा समावेश होता.







