UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

ग्रामदैवत गारभवानी मंदीरात शस्ञपुजन व शमीपुजन.

SHARE:

परंडा प्रतिनिधी परंडा येथील ग्रामदैवत गारभवानी मंदीरात शस्ञपुजन व शमीपुजन करताना तहसीलदार काकडे,पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, नगराध्यक्ष जाकीर सौदागर आदिसह मान्यवर ! 

स्टार माझा न्यूज परंडा, प्रतिनिधी गोरख देशमाने परांडा ता.20 (बातमीदार ) नवराञोत्सवानिमित्त शहरातील ग्रामदैवत असलेल्या गार भवानी मंदीरात मंगळवार ता.20 रोजी सांयकाळी ७ वाजता परंपरेनुसार विधिवत शस्ञपुजा व शमीपुजन करुन सिमोल्लघंन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.आपट्याची पाने लुटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

शहरातील जुन्या तहसील कार्यालयातील ट्रेझरी कार्यालयात सांय सहा वाजता, लक्ष्मीपुजन करुन ढोल ताशाच्या गजरात,आराधी पोत घेऊन वाजत गाजत मिरवणुक काढुन,गार भवानी मंदिरात पुजेचा मान असलेले तहसिलदार निलेश काकडे,पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले यांच्या हस्ते शस्ञपुजन व शमीपुजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मकरंद जोशी यांनी पौराहित्य केले.यावेळी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,नगरसेवक रमेशसिंह परदेशी,प्रकाश काशीद,प्रमोद वेदपाठक,सुरेश घाडगे, बाबा वाबुंरकर,नवनाथ सोनवणे,राजकुमार माने, गोरख देशमाने आदिसह शासकीय कर्मचारी,प्रतिष्ठीत नागरीक आदिंची उपस्थिती होती.यावेळी नवराञ महोत्सवात नऊ दिवस मंदिरासमोर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. शहरात सकाळपासुनच विजयादशमीनिमित्त बाजारपेठेत फुलांसह, विविध वस्तु खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.गारभवानी परिसर आकर्षक रोषणाईने उजळुन निघाला होता.दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. नवराञ उत्सवासाठी मंडळाचे अध्यक्ष रणजित माने, बाळराजे माकणीकर, उमेश सोणवणे,अरुण कानडे,दत्ता मेहेर,राहुल लोकरे,दत्त सोनमुखे,प्रकाश सोनवणे,अभिजित जाधव,गणेश कंकाळ,संजय दनाने,मीरज शिंदे,बबलु पवार, दिनेश तांबिले आदिनीं पुढाकार घेतला.तसेच शहराचे ग्रामदैवत भवानी शंकर मंदिरातील,अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शमीचे पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छां दिल्या.

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें