UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

खरीप दुष्काळ २०२६ : अग्रीम मदत वाटपात बार्शी राज्यात अव्वल! राज्यातील पहिला लाभार्थीही बार्शी तालुक्यातील.

SHARE:

तांदळवाडीत १० खातेदारांना प्रायोगिक तत्त्वावर मदत वितरणास सुरुवात; तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजनाला यश

स्टार माझा न्यूज बार्शी | प्रतिनिधी दिनांक : १ नोव्हेंबर २०२६
खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदत वाटप प्रक्रियेत बार्शी तालुक्याने राज्यात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली असून, तांदळवाडी येथे प्रायोगिक तत्त्वावर मदत वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामात नुकसान सहन कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, माहिती अद्ययावत करणे आणि आवश्यक पडताळणी करण्याची सुविधा तहसीलदारांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील विविध तहसील स्तरावर मदत वाटपाची तयारी सुरू असताना बार्शी महसूल प्रशासनाने या प्रक्रियेत वेग घेतला आहे. बार्शी तालुक्यातील तांदळवाडी येथे प्रायोगिक तत्त्वावर १० खातेदारांच्या मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. या उपक्रमामुळे राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील ठरल्याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजनाला यश.
ही संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महसूल सहाय्यक संदीप नालपे यांनी या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
याशिवाय प्रत्येक गावाचे नियंत्रण अधिकारी तसेच ग्रामस्तरीय पंचनामा समितीतील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत
लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, पोर्टलवर याद्या तयार करणे, माहितीची अचूक पडताळणी करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, यासाठी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना मदत देण्याचे उद्दिष्ट
तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत दिवाळीपूर्वी अग्रीम मदतीचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी मदत वाटपाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक दिलासा मिळावा यासाठी बार्शी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे.
एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे अग्रीम मदत वाटप प्रक्रियेत बार्शी तालुक्याने घेतलेली आघाडी निश्चितच दिलासादायक ठरत आहे. प्रशासनातील समन्वय, नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे बार्शी तालुका राज्यासाठी आदर्श ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें