परंडा- प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या वतीने आयोजित लोककला संवर्धन कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील लोककलावंतानी कला सादर केली.
सध्या सोशल मिडीया च्या काळात ग्रामीण भागातील समृद्ध लोककला, लोकपरंपरा व लोककलावंतांचा वारसा लोप पावत चालला असून तो जपण्यासाठी शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि.१८) घेण्यात आलेल्या लोककला संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वासुदेव, संभळ वादक, हलगी वादक, वाघ्या मुरुळी, घोडानृत्य, लोकगीत गायक, बहुरुपी आदी लोककलावंतानी आपली कला सादर केली. सादरीकरणास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले व लोककलावंत यांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली तसेच लोककलाकारांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात आले.यावेळी वासुदेव कलावंत मदन शिंगनाथ, भगवान धुर्वे,महारुद्र शिंगनाथ यांनी पारंपरिक वासुदेव यांनी कला सादर केली.
[] हंसराज गणेश मंडळाच्या वतीने दर वर्षी विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच समाजपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत.यामध्ये वृक्षारोपण, लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, पाणी आडवा पाणी जिरवा, सार्वजनिक मालमत्ता संरक्षण, आरोग्य शिबीर घेऊन रुग्णाची मोफत तपासणी करण्यात येते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898







