UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

हंसराज गणेश मंडळ विविध समाजपयोगी कार्यक्रम घेते ही बाब कौतुकास्पद. – जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील

SHARE:

 स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने-परांडा शहरातील हंसराज गणेश मंडळ विविध समाजपयोगी कार्यक्रम घेते ही बाब कौतुकास्पद असून मी मंडळाला पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मंडळाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले

शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाला यावर्षी ६० वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त रविवार (दि.२०) मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबीरात २५१ जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, युवा नेते सोहम सावंत, नगरसेविका रत्नमाला बनसोडे, डॉ.आब्बास मुजावर, अनिल शिंदे, राहुल बनसोडे, राखी देशमुख माजी नगरसेवक मकरंद जोशी, रत्नकांत शिंदे, नितीन भोत्रेकर, राहुल देवळे, प्रमोद वेदपाठक, चकोर महामुनी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित जोशी, राहुल मुगळीकर, भगवान शहाणे, अमोल जोशी, आदीसह मंडळाचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ फीत कापून करण्यात आला त्यानंतर श्री ची आरती करण्यात आली व आरोग्य शिबिराला भेट दिली. 

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील पुढे बोलताना म्हणाल्या की, हंसराज गणेश मंडळाला ६० वर्षाचा वारसा असून नवीन युवा मंडळी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असल्याने आपण कायम मंडळाच्या पाठीशी उभा राहणार आहे.गणेश मंडळाला सामाजिक कार्य करण्यासाठी जिल्हा परिषद व स्वतः सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. कार्यक्रमाची प्रस्तावणा समर्थ कुळधर्मे यांनी केली तर सुत्रसंचालन राहुल बनसोडे यांनी केले.

हंसराज गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत महाआरोग्य सर्वरोग निदान व नेत्ररोग निदान शिबिर आयोजित केले होते.सर्वरोग निदानशिबिरासाठी बार्शी येथील सुप्रसिद्ध हृदयरोग डॉ.धीरज जाधव, डॉ.प्रशांत पाटील (ईसाजी तज्ञ), शहाजी नलवडे (श्रद्धा लॅब- रक्त, लघवी मधुमेह तपासणी) यांचे सहकार्य लाभले.सर्वरोग निदानशिबिर डॉ.प्रशांत गोफणे यांच्या हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले.नेत्ररोग तपासणीसाठी एच.व्ही.नेत्ररुग्णालय हडपसर पुणे संचलित शंकरशेठ साबळे नेत्ररुग्णालय सोलापूर यांच्या वतीने गरजू रुग्णांची डोळ्याची योग्य तपासणी करून पुढील उपचार देखील मोफत करण्यात येणार आहेत.नेत्र तपासणी शिबिर डॉ.रेवडकर हॉस्पिटल येथे घेण्यात आले.

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें