अतिवृष्टीग्रस्त मेडिकल व्यावसायिकांना लाखोंची मदत
केमिस्ट संघटनांच्या एकजुटीचा प्रेरणादायी उपक्रम
स्टार माझा न्यूज, परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने (प्रतिनिधी) – दिनांक : २७ मे २०२६
परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुकास्तरीय केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम येथील विश्रामगृहात मंगळवारी (दि. २६) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते.
◆ जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे होते. यावेळी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
◆ पूरग्रस्त मेडिकल व्यावसायिकांना धनादेशांचे वितरण
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून भगवंत मेडिकल, सिरसाव यांना २ लाख रुपये, शिवराज मेडिकल, चिंचपूर (खु.) यांना ८५ हजार रुपये तर एम. एस. मेडिकल, ढगपिंपरी यांना १ लाख १३ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.
◆ “औषध व्यवसाय समाजसेवेचे प्रभावी माध्यम”
केमिस्ट बांधवांनी व्यवसायात पारदर्शकता राखून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. औषध व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. संघटनात्मक एकजूट कायम ठेवत सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे यांनी यावेळी केले.
◆ अनेक मान्यवरांची उपस्थिती
यावेळी मन्नान बासले, फैझल दहलूज, असिफ सय्यद, विकास जगदाळे, लक्ष्मण मुंढे, गजानन साळुंके, गणेश टकले, अन्वर शेख, दिपक ठाकूर, सादिक गणेचारी, राजेश ठक्कर, आनंद केसकर, इलियास बागवान, अवेज शेख, विष्णू भिसे, तेजराज गर्दळे, महेश ननवरे, जयराम डाकवले, महेश घाडगे, रियाज हन्नुरे, आरिफ सय्यद, अमित शेरखाने, रवि राष्ट्रपाल, अभय मस्के, पिंटू काकळे, यशवंत शिंदे, पाशा शहाबर्फीवाले, दिपक मोरे, रामदास सांगळे, नागेश सांगळे, केदार चोबे, शाम सांगळे, दिपक वाघ, अभिजित शेरखाने, सहदेव हिवरे, तुषार बागल, ज्ञानेश्वर भानवसे, अमोल कारले, आकाश पराडे, दत्तात्रय कदम, जोतिराम चोबे व जाफर शेख आदी उपस्थित होते.
◆ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898








