परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने संरक्षण भिंत बांधण्यावरून दोन गटात मारहाण डॉक्टरवर गुन्हा दाखल मोकळ्या जागेत भितीचे बांधकाम का केले म्हणून विचारणा केली असता शिवीगाळ करून मारहाण केली व भांडण सोडवण्यास आलेल्या दोघाजनाना शिवीगाळ केली अशी फिर्याद वाहेद सौदागर यांच्या फिर्यादीवरुन डॉ आनंद मोरे यांच्या विरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात दिनांक २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की परंडा शहरातील वाहेद सौदागर यांची डॉ आनंद मोरे रुग्णालया जवळ जागा आहे सदर जागेवरती त्यांनी बांधकाम सुरु केले आहे दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता वाहेद सौदागर तेथे गेले आसता जागेच्या शेजारी असलेल्या डॉ आनंद मोरे यांनी जागेत भिंत बांघल्याने निदर्शनास आले मोरे यांना भिंत का बांधली अशी विचारणा सौदागर यांनी केली डॉ यांनी आरे रावी करून शिवीगाळ केली अशी धमकी दिली दिनांक २२ रोजी डॉ मोरे यांचे वडिल गोरख मोरे यांना वाहेद सौदागर यांनी तुम्ही भिंत का बांधली अशी विचारणा केली असता गोरख मोरे तु आणि डॉक्टर बघुन घ्या असे म्हणाले दिनांक २३ रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारास नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी डॉ आनंद मोरे यांना याबाबत विचाराणा केली आसता डॉ मोरे यांनी फिर्यादी वाहेद सौदागर यांना दगड फेकून मारला ते जखमी झाले वाहेद सौदागर यांच्या फिर्यादीवरून डॉ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि शंकर सुर्वे करीत आहेत








