UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

परंडा शिक्षण कार्यालयाला माहिती न देणे पडले महागात; राज्य माहिती आयोगाचा ५ हजारांचा दणका,

SHARE:

 

 

  स्टार माझा न्यूज  परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने : ता ३० सप्टेंबर २०२६

माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत आणि आदेश देऊनही माहिती न देणे परंडा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या जन माहिती अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठाने या प्रकरणी जन माहिती अधिकाऱ्याला ५ हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला असून तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे परंडा तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, परंडा तालुक्यातील विजय भानुदास मेहेर यांनी गटशिक्षण कार्यालय, परंडा येथे माहिती अधिकारांतर्गत काही महत्त्वपूर्ण माहितीची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून ही माहिती निर्धारित वेळेत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. माहिती मिळत नसल्याचे पाहून विजय मेहेर यांनी नियमानुसार प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले होते.

प्रथम अपीलावर सुनावणी होऊन संबंधितांना माहिती देण्याचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले होते. तरीदेखील परंडा गटशिक्षण कार्यालयाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे मेहर यांनी थेट माननीय राज्य माहिती आयोग खंडपीठाकडे धाव घेऊन द्वितीय अपील दाखल केले.

राज्य माहिती आयोग खंडपीठासमोर या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर खंडपीठाने परंडा गटशिक्षण कार्यालयाच्या जन माहिती अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा आणि कायद्याचे उल्लंघन गंभीर मानले. त्यानुसार खंडपीठाने दी .12/112025 जन माहिती अधिकाऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच अर्जदाराला तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

विजय मेहेर यांनी प्रशासकीय दिरंगाईविरोधात चिकाटीने आणि कायदेशीर मार्गाने केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले आहे. मेहेर यांच्या या यशाबद्दल सध्या सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें