पथविक्रेत्यांसाठी परंड्यात २२ सप्टेंबरला लोक कल्याण मेळावा
परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने| दि. १८ सप्टेंबर २०२६
प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना अर्थात पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांसाठी लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता स्व. गोपीनाथ मुंडे सभागृह, जुनी नगर परिषद येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध बँकर्स तसेच डिजिटल पेमेंट ॲग्रीगेटर्स यांच्याकडून पथविक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पथविक्रेते, एकल महिला, बचत गटातील महिला सभासद तसेच दिव्यांग लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली व नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी केले आहे.
मेळाव्यात मिळणार विविध योजनांचा लाभ
एकल महिलांसाठी नव्याने प्रकरणे सादर करण्यात येणार असून, पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
तसेच पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील २० हजार रुपयांचे कर्ज पूर्णपणे परतफेड केलेल्या पथविक्रेत्यांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अशा लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डसाठी आवेदनपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेचा अद्याप लाभ न घेतलेल्या दिव्यांग लाभार्थींनीही सर्व आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
पथविक्रेते, महिला बचत गटातील सदस्य आणि दिव्यांग लाभार्थींनी या लोक कल्याण मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण
9405749898 / 9408749898







