UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

प्रा डॉ शहाजी चंदनशिवे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

SHARE:

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने 

परांडा दि.5 जून 2026 फुले शाहु आंबेडकरवादी विचारांच्या प्रसारासाठी, शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक प्रा डॉ. शहाजी चंदनशिवे यांना ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

        निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा दैनिक निळे प्रतीक यांच्या वतीने आयोजित १६ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम १ जून २०२५ रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर, टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.

      डॉ.शहाजी चंदनशिवे हे फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे अभ्यासक व प्रचारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध व्याख्याने, परिसंवाद, लेखन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. शिक्षण, समाजकारण आणि वैचारिक चळवळींमध्ये त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी फुले-आंबेडकरी विचारांचा प्रसार केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून केला असून, नव्या पिढीमध्ये सामाजिक जाणीव व वैचारिक संस्कार रुजविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखन व भाषणातून वैचारिक स्पष्टता आणि सामाजिक बांधिलकी दिसून येते.

      या पुरस्काराबद्दल विविध श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय बप्पा निंबाळकर संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे शिक्षण महर्षी गुरुवर्य राकेश शिंदे महाविद्यालय परंडा येथील प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉक्टर किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्म शिंदे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक, सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी डॉ.शहाजी चंदनशिवे यांचे अभिनंदन केले . त्यांच्या पुढील यशस्वी कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या .

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें