स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने दिनांक १ जून रा प परंडा बसस्थानकात लालपरीचा 78 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
दि 1 जून हा एस.टी.म्हणजे महाराष्ट्राची लाडकी लाल परीचा 78 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मा.आगार प्रमुख श्री रामचंद्र शिंदे साहेब , प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण शहा,महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री गाडेसर, प्रेरणा शाळेचे सह शिक्षक श्री.हाकेसर जि .प. शाळेचे मुख्याध्यापक श्री . जाधव सर वाहतूक निरीक्षक श्रीमती गंगावणे मॅडम, आगार प्रभारक श्री संजय कांबळेसर यांच्या हस्ते लालपरीचे पूजा करून व फित कापून कार्यक्रमचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पञकार श्री प्रमोदजी वेदपाठक , श्री मुजीबजी काझी, श्री बागडे, श्री गोरखजी देशमाने यांनी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लालपरीचे ऋण फेडण्यासाठी श्री प्रकाशजी काशीद हे दरवर्षी प्रमाणे यंदाही आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रक जुल्फिकार जिनेरी, संजय कदम , रामलिंग शिवलकर दिपक चैतन्य यांच्यासह आगारातील सर्व कर्मचारी, पर्यवेक्षक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंकुश धुर्वे, प्रभाकर थिटे श्रीमती शिंदे यांनी सुशोभीकरण केले..







