UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

परंडा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन .

SHARE:

 

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परांडा  दि. २८ मे २०२६ : छावा संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

सध्या कांदा पिकास योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शासनाने कांदा पिकास तात्काळ अनुदान जाहीर करावे तसेच कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

यावेळी अमरभाई शेख यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला.

 

यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश नारायण जेधे, विधी सल्लागार ऍड. महेश चोपडे तालुका अध्यक्ष सुधीर लटके, तालुका उपाध्यक्ष रामराजे काकडे, शहराध्यक्ष हरिभाऊ आदमीले, माजी सरपंच पंडीत जगदाळे, सुनील सातपुते, पांडुरंग गरड, बापू धनवे, सत्यवान डांगे कंडारी, रोहित कदम, संस्कार गरड, श्रीमंत डोके, संजय लटके, अनिल माने, नागनाथ शिंदे, परशु इंगळे, शहाजी साळुंके, अभिलाष सूर्यवंशी, बापू जगदाळे आदी

  छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें