स्टार माझा न्यूज परंडा, प्रतिनिधी गोरख देशमाने दि. १२ परांडा शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या सुफीसंत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन शहीद यांच्या ७०७ व्या उरुसाचे आयोजन शुक्रवार, दि. १८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. उरुसाच्या नियोजनासाठी उरुस कमिटीची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आह
या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निसार खैरूद्दीन मुजावर, उपाध्यक्षपदी चाँद कुदूस मुजावर, सचिवपदी शारुख अक्रम मुजावर, सहसचिवपदी हाजी मलिक अ. रहीम मुजावर, कोषाध्यक्षपदी रफीक अब्बास मुजावर, तर सहकोषाध्यक्षपदी नौशाद इकबाल मुजावर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून तैयब युसूफ मुजावर, सलीम अत्ताऊर रहेमान मुजावर, आरीफ मोईजोद्दीन मुजावर, अन्वर समद मुजावर, रिजवान बादेश मुजावर व मुजाहिद निसार मुजावर यांची निवड करण्यात आली.
सल्लागार म्हणून समीर अबरार मुजावर, अमजद रफीकोद्दीन मुजावर, जाकीर रौफ मुजावर व इम्रान बोदेश मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उमर मुजावर, अब्दुल रहिम मुजावर, हाजी अब्दुल कादर ।मुजावर, रईस मुजावर, हकीम मुजावर, निजाम मुजावर, गौस मुजावर, समीर मुजावर यांच्यासह मुजावर बांधव उपस्थित होते.







