UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

नवरात्रीच्या नऊ माळा… १८ पैठण्या; भावसार समाजाचा महिलांसाठी अनोखा सन्मान सोहळा!

SHARE:

 

  बार्शी प्रतिनिधी दिनांक 7 ऑक्टोबर  हिंगलाज माता नवरात्रोत्सवात ‘महिला सन्मान नवरात्री’; ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान दररोज आरतीनंतर लकी ड्रॉद्वारे दोन महिलांची निवड

बार्शी : नवरात्रोत्सव म्हटले की देवीची आराधना, भक्ती आणि महिलांचा उत्साह हे चित्र हमखास पाहायला मिळते. याच भक्तिमय वातावरणाला महिलांच्या सन्मानाची जोड देत बार्शीतील भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने यंदा ‘महिला सन्मान नवरात्री’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हिंगलाज माता नवरात्रोत्सवानिमित्त ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी रात्रीच्या आरतीनंतर उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने दोन महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक महिलेला पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात येणार असून, नऊ दिवसांत तब्बल १८ महिलांना १८ पैठण्या देण्यात येणार आहेत.

महिलांचा नवरात्रोत्सवातील सहभाग वाढावा, त्यांना सन्मानाची भावना मिळावी आणि देवीच्या आराधनेसोबत समाजातील महिलांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे भावसार क्षत्रिय समाजाच्या विश्वस्त मंडळाने सांगितले.

आरतीनंतर लकी ड्रॉ; दररोज दोन महिलांचा सन्मान

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बार्शी शहरातील महिलांनी नवरात्रीच्या नऊही दिवसांत हिंगलाज माता मंदिरातील रात्रीच्या आरतीस उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आरतीनंतर उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढून दोन महिलांची निवड केली जाईल आणि त्यांना पैठणी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

 

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें