UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

शांतता कमिटीच्या बैठकीला मुख्याधिकाऱ्यांची दांडी!

SHARE:

 

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक इशारा; ‘डीजे नको, उत्सव साधेपणाने साजरा करा’

परंडा | प्रतिनिधी

दिनांक : ११ सप्टेंबर २०२६

परंडा शहरातील आगामी गणपती-गौरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परंडा पोलिस ठाण्याच्या आवारात शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत चर्चेला उधाण आले.

पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस विद्युत वितरण विभागाचे अधिकारी, जिल्हा उपरुग्णालयाचे कर्मचारी, नगरपरिषदेचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक सिरसठ, नगरपरिषदेचे बांधकाम व स्वच्छता सभापती राहुल बनसोडे, नगरसेवक वाजिद भाई दखणी, परंडा शहराचे पोलिस पाटील संजय कदम, शहरातील सर्व परवानाधारक गणेश मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलिस पाटील उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवा!

बैठकीत पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी गणेश मंडळांना यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. पाण्याचा वापर काटकसरीने करावा, उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

विसर्जन मिरवणुकीत डीजेला स्पष्ट नकार!

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राखत उत्सव पार पाडावा, असा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला. गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चोरमले यांनी दिली.

मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

एकीकडे गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलिस आणि विविध विभागांची बैठक आयोजित करण्यात आली असताना नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. नगरपरिषदेशी संबंधित अनेक बाबी गणेशोत्सवाच्या नियोजनाशी निगडित असताना मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती का राहिली, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

दरम्यान, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या अनुपस्थितीचे कारण अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रशासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरणार असून, आता नगरपरिषद प्रशासनाकडून उत्सव नियोजनासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे परंडेकरांचे लक्ष लागले आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण.                          9405749898 / 9408749898

 

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें