पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या हस्ते सन्मान
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा दि २३ ( प्रतिनिधी ) येथील सर्वसामान्य कुटुंबातील व्हॉलीबॉल खेळाडू असलेले सादिक अब्दुल करीम शेख ( तोरणवाले ) यांची सोलापूर येथे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने रविवार दि २३ रोजी महात्मा फुले चौकात परंड्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हाजी शेख अहमद बागवान, हाजी कादर मुजावर, हाजी खालील पठाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुशराव जाधव, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष मुजीब काझी, पत्रकार निसार मुजावर, नगरसेवक सत्तार पठाण, संजय घाडगे, समाजसेवक जमील शेख, राष्ट्रवादीचे श प पक्षाचे शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, बाळू गायकवाड, संतोष सातपुते, सुलेमान शेख, अन्वर शेख, शिवाजी बनसोडे, आयुब जीनेरी, नय्युम शेख, शहाजी नलवडे, तोहीद शेख, वैभव पवार, आवेश शेख, राहुल देवळे, दादा पठाण, गौस सय्यद, विठ्ठल माळी, अमीर जिनेरी, मैनुद्दीन शेख अदि उपस्थित होते .

सादिक शेख हे जिल्हा कवायत निर्देशक पोलीस प्रशिक्षण सोलापूर येथे ड्रिल इन्स्पेक्टर होते . सोलापूर ग्रामीण मध्ये २०१५ पर्यंत करमाळा पोलीस ठाणे, मोडनिंब येथे महामार्ग पोलीस म्हणून प्रामाणिक सेवा केली.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे . त्यांची सेवा ३२ वर्षे पूर्ण झाली असून सध्या ते सोलापूर येथे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत आहेत.
सत्कार प्रसंगी सादिक शेख म्हणाले युवकांनी मोबाईल च्या व्यसनापासून दूर राहून शरीराला खेळाची सवय लावुन कष्ट आणि व्यायाम केल्यास नक्कीच याचा लाभ होतो. मी देखील गरीब कुटुंबातील होतो खेळाची चिकाटी कधीही सोडली नाही. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगीतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुशराव जाधव यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक जमील शेख यांनी परिश्रम घेतले .
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898







