UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

स्वातंत्र्य दिनी राकेशजी बेदमुथा यांच्याकडून ९ शाळांतील ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

SHARE:

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा : येथील सुप्रसिद्ध लक्ष्मी मेडिकलचे मालक राकेशजी बेदमुथा यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

 

श्रीधरवाडी, डोंजा, मुगांव, पवारनगर, रुई, कात्राबाद, रोसा,बावची आणि शिरगिरवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २०० पानांची वही व एक पेन अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

राकेशजी बेदमुथा हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत. शाळेची गरज लक्षात घेऊन त्यांनी यापूर्वी अनेक शाळांना साउंड बॉक्स, थोर राष्ट्रपुरुषांचे फोटो तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

 

गेल्या वर्षी परंडा तालुक्यात आलेल्या पूरपरिस्थितीतही त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांना उबदार ब्लँकेटचे वाटप करून मदतीचा हात दिला होता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असून, त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळावीत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार आहोत,” अशी भावना राकेशजी बेदमुथा यांनी व्यक्त केली.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें