UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

युवा नेते विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा.

SHARE:

 

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने 

परंडा : स्वर्गीय माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे सुपुत्र तथा परंडा शहराचे युवा नेतृत्व विश्वजीत (आबा) ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

वाढदिवसानिमित्त विश्वजीत पाटील यांनी सर्वप्रथम स्वर्गीय माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर परंडा शहराचे कुलदैवत हजरत ख्वाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद दर्गा येथे फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतले. तसेच संत बाळूमामा मंदिर व गजानन महाराज मंदिर येथे आरती करून आशीर्वाद घेतले.

 

सामाजिक बांधिलकी जपत अरबी मदरशातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच परंडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

 

यानंतर परंडा शहरातील विविध १० प्रभाग व चौकांमध्ये कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि समर्थकांकडून विश्वजीत (आबा) पाटील यांचा वाढदिवस केक कापून व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तसेच जयभवानी चौक महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या उत्साहात विश्वजीत आबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला

या प्रसंगी जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, शहरप्रमुख, विविध पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, शिवसैनिक, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे परंडा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें