UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

SHARE:

 

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा:- 80 व्या स्वातंत्र्य दिन कल्याणसागर समूहाच्या परंडा येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय व सरस्वती प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील संस्थेच्या सचिव प्रज्ञाताई कुलकर्णी, रामचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ निवृत्त क्रीडा शिक्षक शिवाजीराव कदम, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ साळुंके, दत्तात्रय धनवे समीर गंधे महादेव नरुटे व सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड तसेच विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर विविध विषयांवर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ साळुंके यांचा मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी रामचंद्र कुलकर्णी यांनी 5000 रुपयांचे रोख बक्षीस देऊन विद्यार्थी व विज्ञान शिक्षक यांना प्रोत्साहित केले. माजी विद्यार्थी समीर गंधे याने एस आर जी एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत इयत्ता चौथी ते सातवी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपये प्रमाणे 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं याप्रसंगी जाहीर केले. 

याप्रसंगी अध्यक्षांच्या हस्ते विद्यालयातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तालुक्यात चौथी शिष्यवृत्ती परीक्षा धारक झालेला अंश लांडगे तसेच सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रावी व्यवहारे आठवी एन एम एम एस परीक्षा धारक स्वरा व्यवहारे तसेच मंथन स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेला ओम गोफणे व मी ज्ञानी होणार 2026 राज्यस्तरावर निवड झालेल्या सुरभी दीक्षित अशोक आगरकर, समर्थ सायकर यांचा बक्षीस देऊन सत्कार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार व खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे , अजित गव्हाणे व आभार प्रदर्शन गणेश पवार यांनी मानले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें