UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

“गोरगरिबांचा घास चोरणाऱ्यांवर पोलिसांचा प्रहार; API अक्षय सोनवणे यांच्या धडाकेबाज कारवाईने रेशन माफियांचे धाबे दणाणले!”

SHARE:

रेशन माफियांना API अक्षय सोनवणे यांचा जबरदस्त दणका!

गोरगरिबांच्या घासावर डल्ला मारणाऱ्यांचे धाबे दणाणले; ₹८.९८ लाखांचा रेशन तांदूळ आणि पिकअप जप्त

स्टार माझा न्यूज

बार्शी | प्रतिनिधी

दि. २५ जुलै २०२६

गोरगरिबांच्या ताटातील घास चोरून काळ्या बाजारात लाखोंची कमाई करणाऱ्या रेशन माफियांवर बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अक्षय सोनवणे यांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी तब्बल ₹८,९८,२३० किमतीचा मुद्देमाल जप्त करून रेशनच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे API अक्षय सोनवणे यांनी तातडीने पथकाला सूचना देत बार्शी–सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ सापळा रचला. संशयित एमएच-१३ डी-क्यू-६१८४ क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स पिकअपला अडवून तपासणी करण्यात आली. वाहनातील ८० कट्ट्यांमध्ये भरलेला तब्बल ४,६९० किलो तांदूळ पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

तपासणीदरम्यान हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) असल्याचा संशय निर्माण झाल्याने संपूर्ण माल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, बार्शी यांच्याकडून करण्यात आलेल्या खातरजमीत हा तांदूळ शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

₹८.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी ४,६९० किलो रेशनचा तांदूळ, ८० कट्टे आणि महिंद्रा मॅक्स पिकअप असा एकूण ₹८,९८,२३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही बार्शी तालुक्यातील अलीकडील काळातील रेशनच्या काळाबाजाराविरोधातील महत्त्वाच्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.

तीघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध शासकीय अन्नधान्याचा अपहार करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिगंबर उर्फ आमरुषी उर्फ आप्पा संभाजी सुरवसे (रा. बार्शी)

विवेक उर्फ भगवान संभाजी सुरवसे (रा. बार्शी)

अक्षय राजाभाऊ बारसकर (रा. दत्तनगर, वैराग)

या प्रकरणाचा पुढील तपास API अक्षय सोनवणे करीत आहेत.

रेशन माफियांना स्पष्ट इशारा

बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे, वाळू, जुगार, मटका आणि काळाबाजाराविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्याचाच भाग म्हणून API अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे रेशन माफियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, “गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेल्याची चर्चा बार्शीत सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. API अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, अमृत खेडकर आणि लक्ष्मण चित्तलवाड यांनी ही कारवाई यशस्वी केली.

बार्शी तालुका पोलीस स्टेशनने अवैध धंदे आणि रेशनच्या काळाबाजाराविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

स्टार माझा न्यूज

संपादक : रियाज पठाणसंपर्क : 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें