परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने ता २७ परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयाचे इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद सर होते. प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे , पर्यवेक्षक प्रविण शेरे सर, पालक व शिक्षक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना हार व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे : 1)प्रणया विनोद खुने-240 2)ओवी हनुमंत पाटील- 240 3) अवधुत हनुमंत कवडे-220 4)आराध्या ज्योतीराम घोगरे- 200 5)समृद्धी विष्णूदास गोडगे- 160 6)सई जितेंद्र पाटील- 158 7)दिव्या नवनाथ पाटील- 146 8) सार्थक गोपाळ मोमले- 144 9) सोहम महादेव लिमकर- 142 10) ईश्वरी इंद्रजीत नरूटे- 140 11) परी औदुंबर गाडे-136.तसेच 1) प्रथमेश सुर्यवंशी याने JEE मध्ये 95.87 व CET मध्ये 91.27 2) करण घोगरे याने JEE मध्ये 92.00 गुण प्राप्त केल्याने विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही सातत्याने अभ्यास करून उच्च ध्येय गाठण्याचा संदेश दिला. मुख्याध्यापकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक शकीलाबानू बाळाभाई , किरण ठाणांबीर , प्रवीण मुडपे , प्रशांत पंडित , विष्णू तोडसाम व गोवर्धन गरड सर यांचेअभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.
या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित पालक – हनुमंत कवडे, विष्णूदास गोडगे, घोगरे, औदुंबर गाडे, खुने मॅडम व पाटील मॅडम.
शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा देण्यात आल्या.







