UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

पूरग्रस्त शेळगावच्या माणिकबाबा विद्यालयाला NAPM व शाश्वत विकास न्यासची भरीव मदत; 

SHARE:

 

दोन लोखंडी कपाटे, वह्या, रजिस्टरसह आवश्यक साहित्याचे वितरण; पूरस्थितीवरील अधिकृत अहवालही विद्यालयाला प्रदान

स्टार माझा न्यूज, परांडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने– दिनांक : २ जुलै २०२६

पूरग्रस्त विद्यालयाला मदतीचा हात

सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर ‘जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय’ (NAPM) आणि ‘शाश्वत विकास न्यास’ यांच्या वतीने विद्यालयाला शैक्षणिक व कार्यालयीन साहित्याची भरीव मदत करण्यात आली.

२९ जून रोजी मदत सुपूर्द

सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ही मदत अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. शाळेच्या परीक्षा, वेळापत्रक आणि उन्हाळी सुट्ट्यांचा ताळमेळ साधून प्रत्यक्ष विद्यालयात भेट देत हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यालयीन व शैक्षणिक साहित्याचे वितरण

या मदतीमध्ये कार्यालयीन कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी दोन मोठी लोखंडी कपाटे, रजिस्टर तसेच विद्यार्थ्यांसाठी वह्यांचा बॉक्स आदी आवश्यक साहित्याचा समावेश होता. याशिवाय NAPM ने पूरपरिस्थितीवर केलेल्या अभ्यासाचा अधिकृत अहवालही विद्यालय प्रशासनाला प्रदान करण्यात आला.

विद्यालय प्रशासनाने व्यक्त केले कृतज्ञता

विद्यालयाचे संचालक तथा ज्येष्ठ शिक्षक ह.भ.प. विजयकुमार परदेशी यांनी ही मदत कृतज्ञतापूर्वक स्वीकारली. यावेळी त्यांनी NAPM च्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेत संस्थेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला ‘आधार सामाजिक संस्था, परांडा’चे झुल्फिकार काझी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत या मदतकार्याचे कौतुक केले. साहित्याचे वितरण झुल्फिकार काझी, युवराज गटकळ (राष्ट्रीय समन्वय) व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षक व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती

कार्यक्रमाला मुख्याध्यापक कुमटकर पांडुरंग सुखदेव यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटाच्या काळात विद्यालयाला दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. पठाण सर यांनी आभार मानले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें