UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

बार्शी पोलिसांची मोठी कारवाई ३ टन बेकायदेशीर मांगूर मासे जप्त; आरोपी अटक!

SHARE:

स्टार माझा न्यूज बार्शी, प्रतिनिधी सोलापूर जिल्हा | दि. २२ मे २०२६बार्शी : मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आगामी बकरी ईद व इतर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पेट्रोलिंग व नाकाबंदी मोहीम सुरू आहे. दि. २२/०५/२०२६ रोजी रात्री २:०० वाजता नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव यांनी बार्शी बायपासरोड, परांडा चौक, नागोबाचीवाडी येथे Ashoka Leyland टेम्पो क्र. KA 52 B 4687 हा संशयास्पद वाटल्याने थांबवला.चालकाकडे विचारपूस केली असता संशयास्पद उत्तरे मिळाल्याने अधिक तपासणी केली. टेम्पोमध्ये पाण्याच्या टाकीत जिवंत मांगूर मासे वाहतूक केली जात असल्याचे आढळले. सोलापूर मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधून वजन केले असता तब्बल ३ टन (३,०००kg) मासे आढळून आले.मांगूर हा परदेशी मासा भारतीय माशांच्या प्रजाती व पर्यावरणाला हानिकारक असल्याने भारत सरकारने त्याच्या संवर्धन, बीज उत्पादन, पालन व वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाणे गु.र.नं. १४६/२६ नुसार भा. न्या. संहिता कलम २२३, २७५, ३(५) सह पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम १५ व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.कारवाईत सहभागी अधिकारी :मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. महेश माने, पो.उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोहेकॉ/१७४७ धनराज केकाण, पोकॉ/७४७ राहुल बोंदर, चापोकॉ/२४ शिवशंकर खराडे यांनी कारवाई केली.

स्टार माझा न्यूज / संपादक : रियाज पठाण / संपर्क : 9405749898 / 9408749898

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें