UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

महाराष्ट्र विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी; १७५ विद्यार्थी पात्र, ४४ जणांना शिष्यवृत्ती.

SHARE:

📰 स्टार माझा न्यूज बार्शी | प्रतिनिधी

दि. १० जुलै २०२६

बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाने सन २०२५–२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत विद्यालयातील एकूण १७५ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी ४४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ७९ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी १७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तर इयत्ता आठवीच्या परीक्षेत ९६ विद्यार्थी पात्र ठरले असून २७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना एस. डब्ल्यू. करंजकर, स्वप्निल पाटील, पी. एस. जाधव, जे. एम. तोगे, व्ही. डी. चव्हाण, ए. आर. जाधव, एस. एस. शेळके आणि व्ही. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले. तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एस. एम. डिसले, एस. एल. देशमुख, ए. व्ही. पवार आणि पी. सी. जुगदार यांचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मिराताई यादव, सदस्य एस. बी. शेळवणे व बी. के. भालके, तसेच प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

📰 स्टार माझा न्यूज

✍️ संपादक : रियाज पठाण

📞 9405749898 / 9408749898

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें