UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

परंड्यात भवानीशंकर मंदिरावर भव्य कलशारोहण; ‘जय बजरंगबली’च्या जयघोषात धार्मिक सोहळा संपन्न

SHARE:

दक्षिणमुखी काळामारुती मंदिराच्या शिखरावर नवीन कलशाची प्रतिष्ठापना; भाविकांची मोठी उपस्थिती, महाप्रसाद व विद्युत रोषणाईने वातावरण भक्तिमय.

स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने – दिनांक : २१ जून २०२६

🔹 धार्मिक विधीवत वातावरणात कलशारोहण

परंडा शहरातील भवानीशंकर मंदिर परिसरातील दक्षिणमुखी काळामारुती मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा बुधवारी (दि. १७) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक विधीवत पूजनासह संपन्न झाला. मंदिर परिसरात दिवसभर “पवनसुत हनुमान की जय”, “बजरंगबली की जय”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

🔹 संत-महंतांच्या हस्ते कलशपूजन

रुईभर येथील गुरुदेवदत्त आप्पाबाबा महाराज, श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीभैरवनाथ गुरु गादीचे महंत पिरयोगी शामनाथ महाराज, योगी बंडोपंतकाका तांबोळकर आणि मंदिराचे विश्वस्त पंडित किशोर महाराज यांच्या हस्ते विधीवत कलशपूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, शिवसेनेचे युवा नेते विश्वजित पाटील तसेच हभप बालाजी बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

🔹 देणगीतून भव्य कलश अर्पण

मंदिराच्या शिखरावरील भव्य कलश संतोषसिंह ठाकूर करमाळकर यांनी देणगी स्वरूपात अर्पण केला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथून आणलेल्या या कलशाची मंगळवारी त्यांच्या निवासस्थानापासून मंडई पेठ, राममंदिर मार्गे भवानीशंकर मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

🔹 होमहवनानंतर शिखरावर कलशारोहण

बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून होमहवन, पूजन व विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारी २ वाजता मंदिराच्या शिखरावर विधीवत कलशारोहण करण्यात आले. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

🔹 महाप्रसाद व विद्युत रोषणाईने भक्तिमय वातावरण

व्यापारी सुरेश कात्रेला यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसराचे सौंदर्य खुलून दिसत होते. भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

🔹 अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान

कपिल बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पं. रोहन बैरागी, रमन बैरागी, हभप तात्या गरड, स्वरुपसिंह ठाकूर, रविंद्र मिश्रा, प्रशांत मिश्रा, कुणाल जाधव, सुजितसिंह करमाळकर, विक्रमसिंह परदेशी, विश्वजितसिंह करमाळकर, अजय पांडे, तुषार पांडे, सुरजसिंह ठाकूर, राज वळसंगकर, यशसिंह ठाकूर, रोहित बेदमुथा, लक्षसिंह ठाकूर, मंथन मिश्रा, पियुशसिंह परिहार, नैतिक मिश्रा, आयुष मिश्रा आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें