UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

महाराष्ट्रातील संगमनेरचा आयपीएस अधिकारी तामिळनाडूत चर्चेत; विजय थलापतींकडून महत्त्वाची जबाबदारी.

SHARE:

 

 

पोटनिवडणुकीपूर्वी त्रिचीच्या पोलिस अधीक्षकपदी प्रवीण डोंगरे यांची नियुक्ती

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 25 मे 2026

महाराष्ट्र राज्यातील संगमनेरचे सुपुत्र आणि २०१६ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रवीण डोंगरे यांची तामिळनाडूतील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांनी आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये डोंगरे यांना तिरुचिरापल्ली (त्रिची) जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या भूमीतून आयपीएसपर्यंतचा प्रवास

प्रवीण डोंगरे हे महाराष्ट्रातील अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी आहेत. त्यांनी पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये बीई पदवी प्राप्त केली असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेरमध्येच झाले. त्यांचे वडील गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे भाऊ न्यायाधीश आहेत.

सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी

प्रवीण डोंगरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवून अनेक विद्यार्थ्यांना नागरी सेवांच्या दिशेने प्रेरित केले. समाजाभिमुख उपक्रमांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.

यूपीएससीत यश, पोलिस सेवेत दमदार कारकीर्द

डिसेंबर २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात तिरुवेरुंबूर येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वी कामगिरी बजावली.

राज्यपालांचे एडीसी म्हणूनही सेवा

२०१९ ते २०२१ या कालावधीत त्यांनी राज्यपालांचे एडीसी म्हणून राजभवनात सेवा बजावली. त्यानंतर थेनी, मदुराई आणि शिवगंगा जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीमुळे त्यांना प्रशासकीय वर्तुळात विशेष मान्यता मिळाली.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती

सध्या त्रिची ईस्ट विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय थलापती विजयी झाले होते. मात्र त्यांनी आमदारकीअभिनेत्री तृषा कृष्णन यांच्या नावाची चर्चाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रवीण डोंगरे यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने या निर्णयाकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीत अभिनेत्री तृषा कृष्णन उमेदवार असू शकतात, अशा चर्चांना वेग आला आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही निवडणुकीपूर्वी करण्यात आलेली प्रवीण डोंगरे यांची नियुक्ती चर्चेचा विषय ठरत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें