UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश विद्यालय, बार्शीचे नेत्रदीपक यश.

SHARE:

 

स्टार माझा न्यूज बार्शी प्रतिनिधी दिनांक 21 फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेसाठी विद्यालयाचे एकूण १२२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

यामध्ये
शौर्य शामसुंदर गवळी व
उर्वीच सचिन दराडे यांनी ३०० पैकी २८८ गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. तसेच २०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८६ आहे.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना श्रीमती विजयालक्ष्मी सुरवसे (गणित),
श्रीमती माने (मराठी),
श्रीमती शेटे (इंग्रजी)
श्रीमती बोंगाळे (बुद्धिमत्ता) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून १४४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी २०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे ७९ विद्यार्थी आहेत. कुमारी श्रुती शशिकांत साठीने हिने ३०० पैकी २७२ गुण मिळवून विशेष यश संपादन केले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना
श्रीमती गाडे (गणित)
श्रीमती बोधले (मराठी) श्रीमती घोलप (इंग्रजी) श्रीमती बोंगाळे (बुद्धिमत्ता) यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक मा. श्री. नलावडे साहेब, संस्थेच्या मार्गदर्शिका मा. सौ. प्रतिभा नलावडे मॅडम, मार्गदर्शक मा. श्री. प्रसाद नलावडे सर, संस्थेच्या सचिव मा. सौ. प्रियंका नलावडे मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम, उपमुख्याध्यापक मा. श्री. येवले सर तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें