UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

पानगावजवळ थारचा भीषण अपघात! एकाचा मृत्यू, तिघे जखमी!

SHARE:

पानगावजवळ भीषण अपघात! भरधाव महिंद्रा थार उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून पलटी; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी.

 

  स्टार माझा न्यूज बार्शी | प्रतिनिधी

ता. २६ नोव्हेंबर २०२६

 

बार्शी-सोलापूर महामार्गावर पानगावजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास महिंद्रा थार गाडीचा भीषण अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसल्यानंतर थार गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत ओंकार गजानन पैलवान (वय २३, रा. जुळे सोलापूर) याचा मृत्यू झाला असून, अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऋषीकेश भोसले व वैभव जाधव हे बाळे टोलनाक्याजवळ असताना ओंकार पैलवान आणि समर्थ जाधव हे महिंद्रा थार (क्र. MH-13-ES-9897) घेऊन तेथे आले. त्यांनी बार्शीला जाऊन येण्याचे सांगितल्यानंतर ऋषीकेश भोसले व वैभव जाधव हे थार गाडीत बसले.

 

ओंकार पैलवान हा गाडी चालवत होता, तर समर्थ जाधव पुढील सीटवर आणि ऋषीकेश भोसले व वैभव जाधव मागील सीटवर बसले होते. वैराग पार करून बार्शीकडे जात असताना पानगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पुढे जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी समोरून इर्टिगा कार आल्याने थार चालकाने गाडी पुन्हा ट्रॅक्टरच्या मागे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी थारची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाला धडक बसली. त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटून थार रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.

 

या अपघातात चालक ओंकार पैलवान याला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. समर्थ बाबुराव जाधव (वय २४) याच्या डोक्याला दुखापत झाली, तर वैभव बाबुराव जाधव (वय २१) याच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर मार लागला. खबर देणारे ऋषीकेश बहादुर भोसले (वय १८) यांनाही किरकोळ मुकामार लागला आहे.

 

सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक काळेले (बक्कल क्रमांक १२६८) करीत आहेत.

 

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण

संपर्क : 9405749898 / 9408749898

 

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें