UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

‘बाळू मामाच्या नावाने चांगभले’ मालिकेतील ‘तात्या’ अक्षय टाक यांचा सत्कार!

SHARE:

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी. गोरख देशमाने ता ३० सप्टेंबर 

 

परंडा:- प्रसिद्ध मराठी आणि टीव्ही अभिनेता प्रामुख्याने कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘बाळू मामाच्या नावाने चांगभले’ या मालिकेतील ‘तात्या’ या भूमिकेसाठी ओळखले जाणारे व ‘तात्याची पैठणी’ फेम अक्षय टाक आणि तारक ‘मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील अभिनेत्री अंकिता बुरांडे टाक यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. 

 

अभिनेता अक्षय टाक हे भारतीय स्टेट बॅंकेतील निवृत्त कर्मचारी परंडा येथील समर्थ नगर मधील रहिवाशी अरूण बुरांडे यांचे जावई असून ते मूळचे पैठण येथील रहिवाशी आहेत. अंकिता व अक्षय हे दोघेही अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या मराठवाड्याच्या मातीतील उदयोन्मुख कलाकारांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी यावेळी भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

 

या प्रसंगी अरूण बुरांडे, भाजपा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सारंग घोगरे, मगनदास पवार, रामदास गुडे, डॅा. अमोल गोफणे, गौरव पाटील, शशी खुणे, कमलाकर शेळके, पाटील सर आदी उपस्थित होते.

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें