UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

सेवामंडळ कडून एस.एस.सी.परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

SHARE:

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परांडा ता ८ ऑगस्ट २०२६ रोजी शनिवार जिल्हा परिषद शाळेत सेवामंडळ कडून एस. एस. सी.परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याच शाळेतील माजी विद्यार्थी ग्रुप कॅप्टन महेश कुलकर्णी यांचे व्याख्यान

परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या एकूण सात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ग्रुप कॅप्टन महेश कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले

यावेळी दिनकर पवार मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्या प्रशाला यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती.

प्रास्ताविक सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील काळे यांनी केले डॉक्टर आनंद पाटील यांनी सेवा मंडळ समस्यांचा परिचय करून दिला पर भाषणातून त्यांनी मंडळाचे कार्य व विद्यार्थी सत्कार यामागील उद्देश सांगितला व्याख्याते महेश कुलकर्णी इंग्रजी गणित व मराठी विषयात असलेले रंजक उदाहरण व गायन करून आपके विचार मांडले

यावेळी श्री जयंत पाटील यांनी

सेवामंडळ परंडा बद्दल सविस्तर माहिती सांगितली. दिपा कुलकर्णी महाजन यांनी आपल्या भाषणात बालपणी च्या प्रशालेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे यांनी परंडा सेवा मंडळ यांच्या सहकार्याने प्रशालेतील समस्या सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू असे आश्वासन दिले सेवा मंडळ कार्याचे कौतुक केले व सर्व मंडळाचे अभिनंदन केले भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खालील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले

जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा

1. पोर्णिमा सिरसकर प्रथम

2. सुहाना मुजावर- द्वितीय

3 सानिका निकाळजे- तृतीय

जिल्हा परिषद प्रशाला परंडा

1. आर्यन खंडागळे प्रथम

2. पालियास शेख. द्वितीय

3. मंगेश बनसोडे

यावेळी माजी नगराध्यक्ष परंडा नगरपरिषद मुकुल देशमुख,मधुकर लोखंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे गोरख देशमाने पञकार, महावीर काशिद संचालक कल्याणसागर बँक,विश्वासराव पाटील, बिभीषण नाना काशिद विशाल काशिद , सेवानिवृत्त शिक्षक अब्दुल गनी हन्नुरे संशोधक विद्यार्थी समर्थ कुलधरमे नामदेव पखाले, तानाजी मिसाळ ,शशिकांत माने, गीतांजली मंडलिक, रेखा उसराटे, माजी विद्यार्थी पालक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल काशिद यांनी केले

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें