UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत सिरसावच्या पृथ्विराज मुकेचा राज्यात १३ वा, जिल्ह्यात ४ था क्रमांक

SHARE:

 गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते पृथ्विराज मुकेचा गौरव

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : ७ जुलै २०२६

 स्टार माझा न्युज बार्शी प्रतिनिधी दिनांक 5 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ मध्ये बार्शी येथील सुयश विद्यालयाचा विद्यार्थी कुमार पृथ्विराज परमेश्वर मुके याने २६८ गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात १३ वा, तर सोलापूर जिल्ह्यात ४ था क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

भव्य पारितोषिक वितरण समारंभ :

मंथन वेल्फेअर फाउंडेशन, अहिल्यानगर आणि मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला हजारो पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव :

यावेळी मा. श्री. अमोल ताकभाते (सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव), मा. श्री. उमेश देशमुख (निरीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय उपआयुक्तालय, सोलापूर), मा. श्री. अनिल बनसोडे (प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ), मा. श्री. रविकीरण रणसुभे (L&T, दुबई, UAE), मा. सौ. शिल्पा राजपूत (समन्वयक, साई हेल्थ फाउंडेशन, पुणे), मा. डॉ. राहुल गोसावी (सहायक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग), मा. श्री. संतोष जाधव (राज्य कर निरीक्षक), मा. श्री. विनोद काटे (सहायक आरोग्य विभाग, धाराशिव), मा. श्री. सचिन रणदिवे (तालुका क्रीडा अधिकारी, सातारा), मा. श्री. वैजनाथ कुटे (धन परिक्षेत्र अधिकारी – RFO, कळंब), मा. श्री. गणेश शिंदे (व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया, बार्शी) तसेच मा. श्री. सुनिल जवंजाळ (विनोदी व ग्रामीण कवी) यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बार्शीसाठी अभिमानास्पद कामगिरी :

कुमार पृथ्विराज परमेश्वर मुके याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या यशामुळे सुयश विद्यालय तसेच बार्शी शहराच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें