UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

वक्फ मंडळाचा निर्णय; वैरागच्या कब्रस्तान ट्रस्टच्या अध्यक्षपदी इस्माईल पटेल यांची निवड.

SHARE:

वैरागच्या जुना-नवा कब्रस्तान ट्रस्टच्या अध्यक्षपदी इस्माईल पटेल; महाराष्ट्र वक्फ मंडळाचा अधिकृत आदेश

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : १९ जून २०२६

◆ वक्फ मंडळाच्या आदेशाने नव्या व्यवस्थापन समितीला पाच वर्षांसाठी मान्यता

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ४२ अंतर्गत आदेश जारी करत वैराग येथील ‘ओल्ड अँड न्यू कब्रस्तान ऑफ मोहम्मदन पीपल्स ऑफ वैराग’ या वक्फ संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये बदलास मंजुरी दिली आहे. या आदेशानुसार इस्माईल उस्मान पटेल यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ११ सदस्यीय नव्या समितीची घोषणा

वक्फ मंडळाने १९ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार पुढील पाच वर्षांसाठी नव्या व्यवस्थापन समितीला मान्यता देण्यात आली आहे. समितीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सदस्य अशा एकूण ११ विश्वस्तांचा समावेश करण्यात आला आहे.

◆ पदाधिकाऱ्यांची नावे

नव्या समितीत इस्माईल उस्मान पटेल यांची अध्यक्ष, आलम उस्मान पठाण यांची उपाध्यक्ष, युसूफ अबुबकर शेख यांची सचिव आणि रईसखान सिराजी पठाण यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इन्नूस पठाण, शाहीद सैय्यद, हमीद तांबोळी, वसीम बागवान, सद्दाम चौधरी, वसीम शेख आणि मौलाना कादर मिर्झा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

◆ वैरागमध्ये आनंदाचे वातावरण

नव्या समितीच्या नियुक्तीनंतर वैराग शहरात मुस्लिम तसेच हिंदू बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात येत असून, ट्रस्टच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, शिस्त आणि विकासात्मक उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

◆ मौलाना आझाद जिल्हाध्यक्षांकडून अभिनंदन

मौलाना आझाद जिल्हाध्यक्ष (सोलापूर) यांनी जुना व नवा कब्रस्तान ट्रस्टच्या अध्यक्षपदी इस्माईल पटेल यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तसेच नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें