स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : १२ जून २०२६
फॉरेस्ट मशीद हॉल येथे होणार आयोजन
सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) समीर गुलामनबी काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वक्फ संवाद कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी दुपारी २.०० वाजल्यानंतर फॉरेस्ट मशीद हॉल, फॉरेस्ट, सोलापूर येथे पार पडणार आहे.
वक्फ संस्थांसाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ
वक्फ संस्था, मुतवल्ली, मशिदी व दर्गा समित्यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमात वक्फ मालमत्तांचे संरक्षण, व्यवस्थापन, विकास, नोंदणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

समस्यांवर थेट चर्चा आणि मार्गदर्शन
वक्फ संस्थांसमोरील विविध अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच वक्फ मालमत्तांचा समाजहितासाठी प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. वक्फ व्यवस्थापन अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शनही यावेळी दिले जाणार आहे.
समीर काझी यांच्यासमोर मांडता येणार समस्या
कार्यक्रमात उपस्थितांना आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा थेट मा. समीर गुलामनबी काझी यांच्यासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच वक्फ विषयक विविध शंकांचे निरसन करून संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक दिशा दिली जाणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर जिल्ह्यातील सर्व वक्फ संस्था, मुतवल्ली, मशिदी व दर्गा समित्यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898







