परंड्यात पावसासाठी मुस्लिम बांधवांची विशेष नमाज; अल्लाहकडे भावनिक दुवा
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा | दि. ११ सप्टेंबर २०२६
परंडा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. पावसासाठी मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केली.
शहराबाहेरील हजरत ख्वाजा बद्दोदीन दर्गा परिसरातील मैदानावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता हाफीज मलिक यांच्या नेतृत्वाखाली विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
नमाज अदा केल्यानंतर पावसासाठी विशेष दुवा करण्यात आली. यावेळी, “माणसांकडून काही चुका झाल्या असतील, पण मुक्या प्राण्यांनी काय केले? त्यांच्या जीवनासाठी तरी पाऊस पडू दे,” अशी भावनिक प्रार्थना करण्यात आली.
पावसाअभावी तालुक्यातील शेतीवर मोठे संकट ओढवले असून, पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतीला दिलासा मिळावा आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण
9405749898 / 9408749898







