UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

शारदीय नवराञ उत्सवानिमित्त शहरातील पुरातन भवानी शंकर मंदीरातील अंबाबाई गाभाऱ्यात घटस्थापना.

SHARE:

 

परंडा, प्रतिनिधी गोरख देशमाने ता.११ परिसरात शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त तालुका व शहर परिसरात देवीच्या विविध ठिकाणी असलेल्या मंदिरात रविवार ता.११रोजी विधीवत पुजाअर्चा करुन घटस्थापना करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक भवानी शंकर मंदिर ,गारभवानी,भगवतीआई मंदिरात परंपरेनुसार धार्मिक उत्साहात घटस्थापना करण्यातआली.

शहरातील भवानी शंकर मंदिरात कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती असलेल्या अंबाबाईची विधीवत पारंपरिक,धार्मिक पद्धतीने पुजा करुन भवानीशंकर मंदिराचे विश्वस्त किशोर बैरागी, कपिल बैरागी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकृर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवराञीनिमित्त दररोज हंसराज महिला भजनी मंडळाचे दुपारी ४ ते ६.३० वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.या मंडळाची ७१ वर्षापासुन अखंड सेवेची मोठी परंपरा सुरु आहे.गुरूवार ता.१५ रोजी देवीची १००० नावे उच्चारुन कुंकुमार्चन सोहळा कार्यक्रम होणार आहे.सोमवार ता.१९ रोजी देवीचा वैदीक हावन,पुण्याह वाचन,सप्तशती पठण,कुष्मांड बली कार्यक्रम होणार असुन सकाळी ९.०५ ते १२.०७ वाजता पुर्णाहुती होणार आहे.या कालावधीत महिलावर्ग विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.देवीच्या मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.तसेच बार्शी मार्गावरील,गारभवानी मंदिरात मोठ्या उत्साहात रविवारी घटस्थापना करण्यात आली.या मंदिर परिसरातच विजयादशमीदिवशी मान्यवंराच्या हस्ते विधिवत शस्ञपुजा करुन “सिमोंल्लघन” खेळण्यात येते.या ठिकाणी दररोज आराधी मंडळ जागर करणार आहेत.शहरातील मंगळवार पेठेतील,रेणुका मातेचे ठाण असलेल्या भगवतीआई मंदिरात घटस्थापना करण्यात आली. शहरात ,सार्वजनिक मंडळाचे भाविकभक्त तुळजापूर येथुन भवानी ज्योत आणुन प्रतिवर्षी प्रमाणे घटस्थापना करतात. नवराञोत्सानिमित्त बालगोपाळ, आबालवृध्द , महिलावर्ग नऊ दिवस मोठ्या भक्तीभावाने देवीची उपासना करुन, काही भाविक पायातील वाहन पाळतात.नवराञोत्सानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तुळजापुरहुन भवानी मातेची ज्योत घेऊन हलगीच्या कडकडाटात “आई राजा उदो उदो ” नामाचा जयघोष करीत परंडा शहरातुन करमाळा तालुक्याकडे जाणाऱ्यां युवकांची संख्या मोठी असते. गतवर्षी नवराञोत्सात

 मुसळधार अतिवृष्टीमुळे परंडा-बार्शी मार्गावर आसलेल्या नद्यांना महापुर आल्याने हा मार्ग बंद पडला होता.त्यामुळे अनेकजण भाविक ज्योत घेऊन अडकुन पडले होते.यंदा माञ पावसाअभावी पाण्याची टंचाई निर्माण झाली असुन भिषण दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना सर्वञच करावा लागत आहे.शेतकरी हवालदिल झाले आहेत.

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें