संपामुळे आरोग्य यंत्रणा सलाईनवर

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परांडा ता २२  संप’ म्हणजे मागण्यांच्या पूर्तते साठी केलेला सामूहिक, संघटित आणि नियोजित काम बंद आंदोलन ,हक्कांची मागणी जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या पाठिंब्याने राज्यातील सरकारी तृतीय व चतुर्थ  कर्मचारी   21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप पुकारला आहे.या मध्ये  उप जिल्हा रुग्णालय परांडा येथील  नर्सेस  व चतुर्थ कर्मचारी   संपावर आहेत.सध्या उन्हाळा चालू असून यामध्ये उष्णतेची तीव्रता खूप वाढली आहे ,अशा वेळी रास्त मागण्यासाठी  संपाचे शस्त्र उगारले आहे.अनेक वेळा सरकार बरोबर बैठका होऊन पण शासन  दुर्लक्ष करत आहे ?असे   कर्मचारी यांचे म्हणणे आहे.    त्या मुळे रुग्णालयात रुग्णाचे उपचारासाठी हाल होत आहे.?सर्वात महत्वाचे कंत्राटी सफाई कामगार यांच्यावर खूप मोठी स्वछतेची जबाबदारी आली आहे.स्वछता कर्मचारी श्री मिलिंद बनसोडे व निशा बनसोडे हेच पूर्ण दवाखान्याची स्वछतेचे जबाबदारी पार पाडत आहेत.तसेच कंत्राटी नर्सेस या बाह्य रुग्ण विभाग व आंतर रुग्ण  विभागात सेवा देत आहेत.या संपामध्ये तृतीय श्रेणी 11 व चतुर्थी श्रेणी 10 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!