स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि ९ तळवडे रेडझोन मधील स्पार्कल मेणबत्ती (कॅण्डल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनी जागा मालकासह चौघांविरोधात विरोधात रात्री उशिरा देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज इंटरप्राईजेस कंपनीचे मालक शुभांगी शरद सुतार वय३५ शरद सुतार वय ४० दोघे राहणार पिंपरी संडास ,आशापुरात फाटा हवेली पुणे, जागा मालक जन्नत नजीर शिकलगार नजर, आमिर शिकलगार दोघे राहणार मोहन नगर चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य वय ३८ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दुर्घटनेत संगीता देवेंद्र आबदार वय ३८ रा. चिखली, पूनम अभय मिश्रा वय ३७राहणार रुपीनगर तळवडे, लता दंगेकर वय ४० राहणार रुपीनगर, मंगल बाबासाहेब खरबडे वय ४५ सहदेव नगर तळवडे, कमलदेवी सुरज प्रजापती वय ६१ परंडवाला चौक देहूगाव, आणि राधा सयाजी गोधळे वय १८तळवडे या सहा महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर कंपनी मालक शरद सुतार वय४० याच्यासह उषा सिताराम पाडवी वय४० कविता गणेश राठोड वय ३५ रेणुका मारुती राठोड कमल गणेश चौरे वय३५ ‘ प्रियांका अमोल यादव वय ३२’ अपेक्षा अमोल तोरणे वय १८, शिल्पा राठोड वय ३१,सुमन गोंधळी आणि प्रतीक्षा तोरणे व १६ अशा दहा जनावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी शिल्पा प्रतीक्षा अपेक्षा आणि उषा या चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी शुभांगी आणि शरद सुतार यांची केकवरील स्पार्कल मेणबत्ती बनवण्याची कंपनी आहे. आरोपी जन्नत शिकलगार नजर शिकलगार यांच्या जागेत ही कंपनी आहे. आरोपी सुतार यांनी स्पार्कल मेणबत्ती बनवण्यासाठी बेकायदेशीर व विनापरवाना स्फोटक व ज्वालाग्रही पदार्थांचा वापर केला कंपनीतील कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीही उपायोजना केल्या नाहीत. आग विझवण्यासाठी कोणतेही उपाययोजना केली नाही. त्यामुळे कामगारांच्या जीविकास धोका होऊन त्यांच्या मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही शिवराज इंटरप्राईजेस कंपनी बेकायदेशीर विनापरवानात चालू ठेवून सहा कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.