दोन महिन्यांमध्ये परांडा तालुका स्वराज्यमय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे – करण गायकर

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.

येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये परांडा तालुका स्वराज्यमय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे- करण गायकर (स्वराज्य संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य)
धाराशिव जिल्हाप्रमुख पदी महेश गवळी मराठवाडा प्रवक्ते जीवन इंगळे मराठवाडा संपर्कप्रमुख पदी अमर भाई शेख यांची निवड*
तालुक्याची आढावा बैठक निजाम जवाळा या ठिकाणी पार पडली या बैठकीसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वराज्य पक्ष राज्य संपर्कप्रमुख तथा प्रवक्ते करण गायकर, मराठवाडा सचिव राजेश मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड.विलास पवार,बाबा रोटे,विजय वाहुळे,किरण डोखे, जिल्हा सरचिटणीस निलेश वीरसर, भूम तालुका अध्यक्ष गणेश नरवडे,अरविंद हिवरे,प्रा सागर गायकवाड,अविनाश ह.भ.प.गणेश महाराज अंधारे, डॉ भाऊसाहेब कराळे सत्यजित साठे,रोहन देशमुख,उपस्थित होते.
या वेळी धाराशिव जिल्हाप्रमुख पदी महेश गवळी, मराठवाडा विभाग प्रवक्ते जीवन इंगळे, मराठवाडा संपर्क अमर भाई शेख, तालुका अध्यक्ष धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे धाराशिव शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सांगडे, परंडा तालुका अध्यक्ष अश्रू कातुरे, उपाध्यक्ष आकाश घाडगे, सचिव विकास रोडे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी सांगितले की स्वराज्य हे आपल्या सगळ्यांचे अस्तित्व असून स्वराज्याचा झेंडा प्रत्येक घरावर फडकविण्यासाठी भूम परंडा तालुक्यातील स्वराज्याच्या शिलेदारांनी प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणचे आमदार खासदार सर्व लोकप्रतिनिधी जनतेला गृहीत धरून स्वतःची मक्तेदारी समजून या विभागात नेतृत्व करत असून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी स्वराज्याच्या सर्व शिलेदारांनी ज्या ज्या ठिकाणी चुकीचे काम होतात त्या त्या ठिकाणी आवाज उठवून न्याय देण्याची बाजू घेतली पाहिजे या भागामध्ये आरोग्य शिक्षण शेती सहकार कामगार या सर्वच विभागातील प्रश्न किंवा समस्या सुटलेल्या नाहीत त्यासाठी आपण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन करून निवेदन देऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे आले पाहिजे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांचा दौरा झाल्यानंतर या भागात बऱ्याच ठिकाणी कामे झाली आहेत आरोग्य विभाग ही या ठिकाणी झालेल्या चुका दुरुस्त करून लोकांची सेवा करत आहे खराब झालेले रस्ते ही अनेक ठिकाणी दुरुस्त झाल्याचे बघायला मिळत आहे हे सर्व श्रेय या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आहे स्वराज्य प्रमुखांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे आपण तंतोतंत पालन करून येणाऱ्या काळात या भागांमध्ये गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या मोहिमेअंतर्गत काम करून स्वराज्य पक्ष बळकट करायचा आहे. राज्य कार्यकारणी सदस्य विलास पवार यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार यांचा सहवास लाभल्यामुळे भागात काम करायला आनंद होत आहे सक्षम नेतृत्व असल्यामुळे कुठल्याही दबावाला आम्ही घाबरत नाही घराणेशाही दबंग गिरी करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी सर्व स्वराज्याच्या मावळे एक दिलाने एक विचाराने काम करत आहोत आणि निश्चित त्यात आम्हाला यशही मिळत आहे.
नवनियुक्त जिल्हाप्रमुख महेश गवळी जीवन राजे इंगळे अमर भाई शेख यांनीही येणाऱ्या काळात धाराशिव जिल्हा हा निश्चितपणे स्वराज्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल त्यासाठी आम्ही रात्र दिवस परिश्रम घेऊन छत्रपतींचे विचार हे गाळापर्यंत पोहोचवणार असून निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी धाराशिव जिल्ह्यात निर्माण करू.
या मिटींगचे ज्यांनी आयोजन केले होते ते महावीर सांगळे व परंडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये तालुक्यामध्ये 80 ते 85 शाखा स्थापण्याचा संकल्प केलेला आहे.स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांची परंडा तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठी महाराष्ट्रातील आयोजन करून एक आगळावेगळा इतिहास घडवून दाखवू असा उपस्थित मान्यवरांना दिला. मोठ्या संख्येने समाज बांधव या मीटिंगसाठी उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!