स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परांडा ,दिनांक 26 /9/2023 पवार काॅम्पलेस येथील दिव्यांग संपर्क कार्यालयात
महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना
तथा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलची बैठक प्रदीप डोके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ..
या बैठकीमध्ये अंत्योदय रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, बीज भांडवल योजना,व विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी 21 सप्टेंबर रोजी झालेल्या दिव्यांग विभाग आपल्या दारी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांचा सत्कार करण्यात आला ..
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल नागनाथ नरूटे यांचा सत्कार करण्यात आला, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, संस्थापक सचिव रियाज पठाण, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके,जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा उपाध्यक्ष घणशाम शिंदे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष सलामत शेख, अमित कुमार लटके तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग चोबे, लक्ष्मीकांत पुरंदरे,रियाज शेख,अश्रुबा चोबे,हरिचंद्र गवळी, गंगाराम गटकुळ,छबू गायकवाड, दादा झिरपे,ओम सुतार, संतोष काळे, सचिन लटके,अर्जंन कणसे,रवी अंधारे,सागर चोबे, दिगंबर चौबे, राजेश गुतेकर, समाधान अंधारे,
परंडा तालुक्यातील दिव्यांगाच्या सवलती विषयी अडचणी आहेत त्या संघटनेच्या वतीने सोडविल्या जातील असे प्रदीप डोके यांनी सांगितले व समाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,व संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे यांनी मार्गदर्शन केले व आभार राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे यांनी मानले
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.