मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथील शाळेत इयत्ता चौथीची बालसभा उत्साहात संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- दिनांक 26/08/2023 रोजी मॉडर्न शाळेतील इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 या विषयावर आधारित बालसभेचे आयोजन केले होते.दोन दिवस आधी सर्व मान्यवर व प्रशालेतील शिक्षकांना चौथीच्या विद्यार्थ्यांनी निमंत्रण पत्रिका देऊन बालसभेसाठी आमंत्रित केलं.
14 जुलै 2023 रोजी अवकाशात झेप घेतलेले चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीरित्या चंद्रावर उतरले व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आणि भारताने इतिहास रचला.चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग ही भारताने केलेल्या ऐतिहासिक घटनेची नोंद सुवर्णाक्षरात झाली आणि आपण या ऐतहासिक घटनेचे साक्षीदार.झालो यासाठीच इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते.या बालसभेचे अध्यक्षस्थान इयत्ता चौथीमधील शिवनेरी गटाचा अभ्यासमंत्री चि.चैतन्य लोखंडे याने भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी गटाची सांस्कृतिक व बाह्यस्पर्धा मंत्री कु.श्रेणू गवळी ही विद्यार्थीनी उपस्थित होती. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री.पांडूरंग मराडे,शिशु गटाच्या शिक्षिका सौ.प्रविणा कुलकर्णी,शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुजाता कुलकर्णी व पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.रेणुका पडवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बालसभेचे सूत्रसंचालन इयत्ता चौथी शिवनेरी गटाचा वर्गमंत्री चि.सोहम पडवेकर याने केले.प्रास्ताविक शिवनेरी गटाचा क्रीडामंत्री चि.समर्थ तकिक याने केले.त्यानंतर चांद्रयान-3 विषयी कु.आरवी करळे,कु.आर्या बावणे, चि.शिवतेज पवार, कु.आरोही तौर,कु.लावण्या साळवे,कु.संस्कृती शेकडे, चि.रूद्र चोपडे,चि.साई शेळके आणि कु.स्पृहा ठोंबरे या सर्व विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 चा उद्देश,त्यासाठी वापरण्यात आलेले बाहुबली रॉकेट,विक्रम लॅंडर,प्रज्ञान रोव्हर,त्यांचा प्रवास,चांद्रयान-2 व चांद्रयान -3 यांमधील फरक,या मोहिमेसाठी लागलेला खर्च इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करून बालसभेत सहभाग घेतला व अतिशय नावीन्यपूर्ण अशी माहिती उपस्थितांना सांगितली. बालसभेचे अध्यक्ष चि.चैतन्य लोखंडे याने ‘हिंदुस्तान का दम,चांदपर पर कदम’ या वाक्याने भाषणाची सुरुवात केली.या ऐतिहासिक मोहिमेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले व आपल्या देशाविषयी अभिमान व्यक्त केला.ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुजाता कुलकर्णी यांनी या बालसभेतून प्रेरणा घेऊन आपल्यापैकी अनेक विद्यार्थी इस्रो या संस्थेत जाऊन देश सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक श्री.पांडुरंग मराडे यांनी *Now The INDIA is on the MOON* असे सांगत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री.कैलास माळी सर,सौ.गीतांजली रायरीकर मॅडम,श्रीमती माया सूर्यवंशी मॅडम या वर्गशिक्षकांचे अभिनंदन केले.बालसभेच्या शेवटी शिवनेरी गटाची स्पर्धापरीक्षा मंत्री कु.संस्कृती डांगे हिने सर्व मान्यवर,शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे आभार मानले.सर्व विद्यार्थ्यांनी नही कोई शंका,चांदपर डंका!हिंदुस्तान का डंका, चांदपर तिरंगा!भारत में हैं दम,देखो चांदपर आ गये हम!चंदा मामा दूर के नहीं,अभ हैं टूर के!जय विक्रम, जय प्रज्ञान,जय चांद्रयान! अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला व बालसभेचा शेवट पसायदानाने करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.श्री.गजानन एकबोटे,प्रशालचे शाळा समितीचे प्रमुख मा.श्री.चित्तरंजन कांबळे, व्हिजिटर मा.श्री.राजीव कुटे यांनी या आगळयावेगळ्या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बालसभेला शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!