पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड: – दि. १८ ऑगस्ट २०२३ चिंचवडमधून श्री मंगलमूर्ती द्वारयात्रेला प्रारंभ झाला. रविवारी उत्तर द्वार यात्रेने होणार समारोप. चिंचवड येथील समाधी मंदिरातून श्रावण प्रतिपदेला.निघणाऱ्या द्वार यात्रेला गुरुवारी दि.१७ सकाळी ९ वाजता गाजत वाजत प्रारंभ झाला.या यात्रेत शेकडो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध चतुर्थी या चार दिवसात द्वार यात्रा आयोजित करण्यात येते. गेल्या४६० वर्षापासून किंवा अधिक काळापासून ही परंपरा सुरू आहे. चिंचवड देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते सकाळी मंगलमूर्ती वाड्यामध्ये विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन द्वार यात्रेला प्रारंभ झाला. श्रावण प्रतिपदेला द्वार यात्रा पूर्व द्वार श्री मांजराई देवीकडे मार्गस्थ झाली. एम्पायर इस्टेट येथील श्री मांजराई देवी मंदिराच्या विश्वस्थानी द्वार यात्रेचे स्वागत केले. ही द्वारयात्रा देवीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर देवीची पूजा, गोंधळ असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी चिंचवड देवस्थानचे जितेंद्र देव, किशोर जोशी, विठ्ठल शिंदे, आप्पा कुलकर्णी आधी पदाधिकारी उपस्थित होते. शुक्रवार दि.१८ दक्षिण द्वार वाकड येथील आसराई देवी मंदिर शनिवारी दि.१९ पश्चिम द्वार रावेत येथील ओझराई देवी मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहे. रविवारी २० उत्तर द्वार म्हणजेच समारोपाच्या दिवशी आकुर्डी येथील मुक्ताई देवी मंदिरत ही द्वार यात्रा काढण्यात येईल अशी माहिती चिंचवड देवस्थानाच्या विश्वस्ताकडून देण्यात आली आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.