एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विना परवाना झाडे तोडणाऱ्या कंपनी मालकासह दोघांवर गुन्हा दाखल

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.१८ ऑगस्ट २०२३ एका खाजगी कंपनीच्या आवारातील विनापरवाना ८ झाडे तोडणाऱ्या कंपनी मालक आणि ठेकेदार अशा दोघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दि. १६ सायंकाळी एमआयडीसीतील कट फास्ट कंपनी एफ २ ब्लॉक वंडर कार शोरूम जवळ घडला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान सहाय्यक सुहास एकनाथ सामसे वय ४७ रा. मनीष गार्डन पिंपरी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनी मालक सुरेश जे बजाज आणि ठेकेदार राजेंद्र बाबू मांजरे वय ३५ रा. बैध्द नगर निगडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी एफ२ ब्लॉक मधील कट फास्ट कंपनी समोरील फूटपाथवरील आणि आवारातील झाडे तोडल्याची माहिती वृक्षप्रेमींनी महापालिका आयुक्तासह उद्यान विभागाला दिली. त्यानुसार उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी येथे जाऊन पाहणी केली. कट फास्ट कंपनी समोरील फूटपाथवरील ४ मोहनगणी,१ कांचन.१ किसिया, १ रेनट्रीचे झाड तर कंपनीच्या आतील आंब्याचे १ झाड असे एकूण ८ झाडे विना परवाना तोडल्याचे आढळून आले आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!