संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, विविध सामाजिक संघटनांचा धडक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोध गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आज दिनांक 10 रोजी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी आलेल्या निवेदनात म्हटले आहे. की संभाजी भिडे यांनी संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पेक्षा मनुष श्रेष्ठ होता तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असू शकत नाही. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत असू शकत नाही १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र दिवस नाही १५ ऑगस्ट ला काळा दिवस पाळून उपास करावा असे बेताल वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वतंत्र सैनिकांचा आपमान केलेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आईच्या चरित्रावर संशय घेऊन महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरलेले आहेत. तसेच महात्मा फुले हा भडव्याच्या यादीतील समाज सुधारक आहेत. संभाजी भिडे सातत्याने देश विघातक तसेच धर्मा धर्मामध्ये जाती-जातीमध्ये समाजात अशांतता निर्माण होईल असे वारंवार व्यक्तव्य करत असून सत्ताधारी त्याला कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पाठीशी घालत आहेत. त्यामुळे देशप्रेमी नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जास्त या मागणीसाठी २८ जून 2023 रोजी पिंपरी चिंचवड पोलिस त्यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. तसेच २८ जुलै २०२३ रोजी दुसऱ्यांदा लेके तक्रार केले ते परंतु, घेतलेल्या तसेच संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!