www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.
बार्शीतील एलआयसी शाखेचे वृक्षारोपण
बार्शी येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) शाखेच्या वतीने शनिवारी सोलापूर रस्त्यावरील व्ही के मार्ट शेजारील रुई तळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात वरिष्ठ शाखा प्रबंधक किशोर वानखेडे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी विकास अधिकारी उन्मेष पोतदार, राजेंद्र कासार, सुहास शामराज, अमोल शेटे यांच्या सह मुकुंद देशपांडे, श्रीमती सूर्या सक्सेना, गणेश तोष्णीवाल, प्रमोद पुजारी, महिंद्र कुलकर्णी, विश्वास ठोंबरे, संतोष मस्के, मोरवे, बाळासाहेब मुंढे, भारत कोरे, सचिन सौदागर, विजय बागडे, दादा वायचळ, सुभाष मंडलिक तसेच विमा प्रतिनिधी कुंदन राऊत, अनिता घोळवे, शुभांगी ढगे, विद्या पोतदार, जयश्री पोतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वृक्षारोपण केले. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे, झाडे लावा, झाडे जगवा इत्यादी घोषणा दिल्या गेल्या. हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कपिल कांबळे साहेब व वृक्ष संवर्धन समिती चे श्री. योगेश गाडे सर यांनी विशेष कष्ट घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.