श्री गणेश बॅंक सेवा केंद्र भोंजा हवेली येथे मोफत आधार प्रमाणिकरण चा शुभारंभ.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा दिनांक. २९ रोजी भोंजा हवेली येथे २०२२ मधील सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनचे अनुदान साठी श्री गणेश बॅंक सेवा केंद्र भोंजा हवेली येथे आधार प्रमाणिकरण *मोफत* चा शुभारंभ करण्यात आला या आधी महाराष्ट्र राज्य सरकारने ५० हजार प्रोत्साहन सुरू केली होती तेव्हा देखील श्री गणेश बॅंक सेवा केंद्र चे सर्वेसर्वा डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी मोफत आधार प्रमाणिकरण केले होते.
सध्या परंडा मंडळ, सोनारी मंडळ, जवळा नि. मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळणार आहे यासाठी भोंजा येथील व आजुबाजुच्या शेतकऱ्यांच्या समस्या गावातच दूर करण्यासाठी श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी लि भोंजा हवेली डायरेक्टर गणेशदादा नेटके कायम शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कटीबद्ध आहेत. यावेळी उपस्थित सोसायटी चे व्हाईसचेअरमन सतिश नेटके, सरपंच समाधान कोळी, डायरेक्टर गणेशदादा नेटके, युवा शेतकरी प्रफुल्ल मोरे, संचालक बाळासाहेब नेटके, सदस्य अरुण कोळी, बागायतदार प्रवीणकुमार नेटके, अंकुश कोळी, बिरमल कोंडलकर, दादासाहेब भांदुर्गे, लव्हू जाधव, तात्या सरवदे, देविदास सरवदे, लक्ष्मण कोळी, परमेश्वर भांदुर्गे, रोहित नेटके इ मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!