सिनेट सदस्य देविदास पाठक यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ सुनिल जाधव यांच्या हस्ते केला सत्कार
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी शहाजी चंदनशिवे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण हे प्रमुख ध्येय आहे आणि त्या ध्येयापासून विचलित होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी स्वतः सतर्क राहिले पाहिजे असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्त केले .ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ प्रशिक्षक संतोष शिंदे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते .
यावेळी पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आचरणात आल्या पाहिजेत जसे की घराच्या बाहेर पडताना आपण कोणत्या वेळी बाहेर पडतो अनोळखी ठिकाणी जाताना त्या ठिकाणची माहिती आहे का याचा विचार करून बाहेर पडले पाहिजे . तसेच आपण मोबाईलचा वापर करतो त्यामध्ये काही माहिती नसलेल्या गोष्टी आपण ओपन करून स्वतःची माहिती भरून स्वतःच धोके निर्माण करून घेतो त्या ऐवजी आपल्या भविष्याचा विचार करून करिअर कडे लक्ष देणे अपेक्षित आहे वाईट मार्गाचा अवलंब केल्यास आयुष्याचे नुकसान होते ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
प्रशिक्षक संतोष शिंदे यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले . संकट आल्यास कसे सामोरे जायचे यासंदर्भात डेमो करून दाखविले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख शिक्षकेत्तर कर्मचारी उत्तम माने धनंजय गायकवाड भागवत दडमल हनुमंत मार्तंडे आणि प्रमोद केजकर यांनी सहकार्य केले शेवटी आभार डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले .
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.