पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे जोडे मारण्यात आले. व त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की सदाभाऊ खोत यांना राजू शेट्टी व गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने आमदारकी, मंत्री पद मिळाले मात्र त्यांनी त्यांच्याशी दगा केला. वास्तविक खोत व त्यांच्या मुलाची पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा निवडणूक येण्याची कुवत नसतानाही त्यांना केवळ दुसऱ्याच्या आशीर्वादाने पद मिळाले स्वतः कृषी राज्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या शेतकरी हिताची एकही काम केले नाही. मात्र केवळ पवार साहेबांवरती टीका करून भाजपाकडून काहीतरी तुकडा मिळेल का यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पवार साहेबांवर टीका न करता आता शिल्लक संघटनेचे काम पहावे. कोणी कितीही काहीही बोलले तरी शरद पवार साहेब यांचे कार्यकर्ते महाराष्ट्र, राज्यभर, देशभरात आहेत. त्यामुळे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पवार साहेबांच्या आशीर्वादाने व नेतृत्वात सर्व निवडणुका यशस्वी होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ओम प्रकाश मोरया, इरफान चौधरी, नाना कसबे, सलीम डांगे आबा शेलार, जय जाधव ,हरीभोई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898