पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
तळेगाव:-दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील मास्टरमाइंड चंद्रभान तथा भानू खळदे याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. खळदे हा मागील दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने केली आहे. चंद्रभान विश्वनाथ खळदे हा माजी नगरसेवक असल्याने त्याच्याबद्दल पोलिसांना म्हणावा अशी माहिती मिळत नव्हती. मात्र पोलिसांनी खळदेच्या नातेवाईक मित्र यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरुवात केली. आरोपी हा विविध ठिकाणी लपून फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी गुंडाविरोधी पथकाचे हरीश माने व स्टाफ यांना कळले हा नाशिक शहरांमध्ये लपून बसण्याची खबर मिळाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने करत आहेत.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.