नागपूरच्या क्रांतिकारी भूमीत महाविकास आघाडीची भव्य दिव्य वज्रमूठ सभा संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

नागपूरच्या क्रांतिकारी भूमीत महाविकास आघाडीची भव्य दिव्य वज्रमूठ सभा संपन्न झाली. नागपूरने पाठिंबा द्यायचे ठरवले, विदर्भानेही पाठिंबा दिला आता यश हमखास आपलेच आहे. स्व. इंदिरा गांधीजींनाही याच विदर्भातील जनतेने भरभरून पाठिंबा दिला होता आणि त्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या होत्या.

आमची ही वज्रमूठ सभा ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे, विदर्भ वासियांची वज्रमूठ आहे. या सरकारने महाराष्ट्राला काय दिले? कोणते प्रकल्प विदर्भासाठी आणले? शेतकऱ्यांना काय मिळाले? तरुणांना सरकारने काय दिले? यांनी महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले. जे त्यांच्या सोबत नाहीत त्यांना संपवण्याचे काम केले.

अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी या राज्याच्या विकासासाठी अनेक कामे मंजूर केली, त्या कामांना निधी दिला. मात्र या सरकारने सर्व विकास कामांना स्थगिती दिली. आपण न्यायालयात जाब मागितला. न्यायालयाने देखील स्थगिती उठवली. मात्र या नतद्रष्ट सरकारने कामांवरची स्थगिती काही उठवली नाही.

महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले. शेजारचे राज्य आपले उद्योग पळवत आहेत. मात्र सत्ताधरी एक अवाक्षर देखील काढत नाही. त्यांना आपली खुर्ची जाण्याची भीती आहे. तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष आहे. आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देखील त्यांनी गमावले आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात डांबण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्रातील थोर व्यक्तींना सातत्याने अपमानित करण्याचे कार्य राज्यपालांसह इतर नेत्यांनी केले. राज्याच्या अस्मितेला यांनी ठेच पोहोचविण्याचे काम केले आहे. येथील जनता संयमी आहे. ते निवडणुकांची वाट पाहत आहेत. या लोकांना योग्य धडा शिकविल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत.

गेल्या दहा वर्षाचा आलेख पाहता आपला देश सर्वच पातळीवर पिछाडीवर गेला आहे. आपल्या लोकशाहीवर घाला घातला जात आहे. त्यामुळे ही वज्रमूठ आता आपल्याला अधिक भक्कम करायची आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण जाऊयात आणि पुन्हा राज्यात बहुजन विचारांचे राज्य आणूयात. असे जयंत पाटील म्हणाले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!