स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर . पिंपरी-चिंचवड:- चिंचवड विधानसभा पोट निवडनुकीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणाला बोललो नाही बंडकरांचे आमचे काही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला उभे करा, त्याला पाळावा हा आमचा व्यवसाय नाही. बंडखोरीचा फायदा तोटा कोणाला होईल यामध्ये आम्हाला काहीही रस नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शहरात आले होते. आकुर्डीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष महेश लांडगे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव अमित घोडके, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रवक्ते एकनाथ पवार, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके, यावेळी उपस्थित होते बावनकुळे म्हणाले दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील उमेदवारा असल्याने आणि आमदारकीचा सव्वा वर्षाचा कालावधी असल्याने निवडणूक बिनविरोधक करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली, पण त्यांनी मान्य केले नाही. चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. भाजप उमेदवार आश्विनी जगताप यांच्या पाठीशी केंद्र, राज्यातील डबल इंजिनचे सरकार आहे. त्यावेळेस चिंचवडच्या विकासाला गती येईल. चिंचवडची जनता मतांचे कर्ज देईल आणि भाजपाचा ऐतिहासिक विजय होईल. भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे. भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या स्वतःचे चेहरे आरशात बघितले पाहिजेत सत्य पासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ज्यांची विचारणार आहे ते आमच्या विरोध विचारधारेची बरोबरी करू शकत नाहीत एवढेच बावनकुळे यांनी सांगितले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










